॥ पुढाऱ्याचे बुबुळं॥
आपातग्रस्त भागात
एका वनवासी तरुणीला
एक खादीधारी कपडे वाटप करतो
हा चित्राचा विषय
ooo
ओसाड पार्श्वभूमिवर
अर्धवट स्मित करणारी
अर्धे अधीक उध्वस्तन उधडे असलेली
जेमतेम वस्त्र घातलेली वनवासी तरुणी
आजूबाजूचे टाळ्या पिटणारे अस्पष्ट चेहरे
स्थूल पुढारी , त्याची टोकदार टोपी इत्यादी
सारे रंगवून झाले
ooo
पण
पुढाऱ्याचे बुबुळं काढतांना
मला लाज वाटली