chikhli

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

दिवाळी....

मला माझ्या लहानपणची दिवाळी आठवते ,आमचे गाव खुप छोटे होते. कोणही दिशेने जायचे
यायचे असल्यास दोन ते अडीच कोस (7-8
किमी ) पायीच जावे लागायचे.
त्यावेळी आमच्या गावात लाइट नव्हती.आमच्या गावाजवळ थुगांवला ( आताचे
पुर्णानगर ) मोठा बाजार भरायचा. खूप
वेळेला मी लहानपणी आजोबांसोबत
बाजाराला जायचो. मी चालुन दमलो कि मला ते
पाठीवर किंवा खांद्यावर उचलुन घ्यायचे
येतांना रात्र व्हायची. दिवाळीच्या दिवसात
छोट्या छोटया पणत्यांनी उजळलेलं गाव इतकं
सुंदर दिसायचं कि त्याचे वर्णन शब्दांत
करता येत नाही. आताच्या 'लाईटिंग'
च्या झगमगाटाला त्याची सर नाही.
आता माणसं, घरं सगळच झकपक पण
त्या वेळेस लोकांमध्ये
जो जिव्हाळा होता तो आज दिसत नाही.

- रवींद्र खानंदे

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६